आंगा आणुनि वारें पोरा घालिसि हमामा ।
निघोनियां जाईल पुढें पडासे येऊनि दमा ॥१॥
घुमे एक्याभावें ।
हा गोपाळ घेउनि सवें ॥२॥
तोंडा येतो फेंस पुटिला नाचसिल बा रे ।
पडतां निसतोश मग हांसतिल पोरें ॥३॥
निळा म्हणे सकळही सोडुनियां तमा ।
एका हरिविण तया नांव हमामा ॥४॥