सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी ।
मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं ॥१॥
वेंघ ऐशावरी घेऊनि सवें हरि ॥२॥
जगडवाळ झाड वरी खांदयाहि वांकुडया ।
उलंडल्या वरुनि हात मोडतील मांडया ॥३॥
निळा म्हणे श्रीहरी ते दृष्टी धरुनियां ।
वेंघे वरी जाई दुरी न पवसी अपाया ॥४॥