चढोनियां झाडा पोरा – संत निळोबाराय अभंग – २५८
चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी ।
निसरतां हात पाय माझा होईल मोडी ॥१॥
धरुनी हरि चित्तिसी खेळे वरिझाडा ।
अभिमानें जासी तरी होईल चुरा हाडा ॥२॥
दिसती त्या खाधा पोरा मोठयापरी ठीसरी ।
मोडती आंगभारें याचा विश्वास न धरीं ॥३॥
निळा म्हणे सांगितलें धरि चित्तें मनें ।
मग तूं चढेवरी सुखें हिंडे खादयापानें ॥४॥