खेळ खेळ झेंपा गे – संत निळोबाराय अभंग – २५७

खेळ खेळ झेंपा गे – संत निळोबाराय अभंग – २५७

खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा ।
नाहिंतरि पुन:पुन्हां न चुकति खेपा ॥१॥
घेंई बारवोटीं गे काढी सागरगोटी ।
जेणें अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटीं ॥२॥
बरवि घालि झेंप गे लांबउनि हात ।
नाहिं तरी लाजोनियां आयुष्या करिसि घात ॥३॥
निळा म्हणे डोले गे हरीचिया तोलें ।
जेणें इहपरलोकीं विकसिल मोलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खेळ खेळ झेंपा गे – संत निळोबाराय अभंग – २५७