विटिया दांडू मांडिती – संत निळोबाराय अभंग – २५६

विटिया दांडू मांडिती – संत निळोबाराय अभंग – २५६

विटिया दांडू मांडिती खेळा ।
मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥
सुं म्हणोनियां मारिती टोला ।
हांसती त्याला डाव घेतां ॥२॥
धांवती एक ते उभेचि ठाकती ।
जिंकोनियां मानिती आपण धन्य ॥३॥
निळा म्हणे खेळ मोडा रे गडि हो ।
कान्होबाचे पाहों पाय आतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विटिया दांडू मांडिती – संत निळोबाराय अभंग – २५६