विटि दांडू भला रे – संत निळोबाराय अभंग – २५५

विटि दांडू भला रे – संत निळोबाराय अभंग – २५५

विटि दांडू भला रे तरीच मारीं टोला ।
नाहीं तरि डाव घेतां धांवडिती मुला ॥१॥
सावधान पाहे रे हरीचि चित्तीं ध्याये ।
न राहोनि निदसुरा खेळाच्या प्रवाहें ॥२॥
हाणें नीट दांडू रे नाहीं तरी नाडू ।
वाउगाचि टोला होतां पावसील दंडू ॥३॥
निळा म्हणे हरिमुखें म्हणतांचि सुनेति ।
न चुके जो त्वरा करी तोचि पावे कीर्ति ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विटि दांडू भला रे – संत निळोबाराय अभंग – २५५