म्हणसी कडवसां गे मायेचिया बैसा ।
मायाचि नाहीं मिथ्यापणें निजबोधप्रकाशा ॥१॥
लपों कोणीकडे गे सांग बाई निवाडें ।
अविदयाही म्हणसी तरी ते न दिसे निवाडे ॥२॥
कैंचें मी माझें हें गे झांकोळिलें तेजें ।
अवघी आत्मराजें माझया उजळीं निजें ॥३॥
निळा म्हणे नुरे गे लपणेंचि वोंसरे ।
याचिया प्रकाशें उजळले दरे खोरें ॥४॥