चाल म्हणसी बाईगे – संत निळोबाराय अभंग – २५३
चाल म्हणसी बाईगे खेळों लपंडाई ।
जेथें तेथें साक्ष कान्हा लपो कोणें ठाई ॥१॥
झाकुनियां डोळा गे लपविली चपळा ।
लेपों जाति जेथें तेथें कलकलिती बाळा ॥२॥
पडसाई नसे गे अवघाचि प्रकाशे ।
सर्वठाई व्यापूनि आत्म वनमाळि वसे ॥३॥
निळा म्हणे खेळगे अवघाचि हो पळ ।
जेथें तेथें साक्षपणें वतें हा गोपाळ ॥४॥