खेळ मांडी गडियांसवें । आपण लपावें लपवी त्यां ॥१॥ म्हणे अवघे झांका डोळे । आपण पळे पळवी त्यां ॥२॥ आला डाव दयावी पाळी । मागे जवळी गडियांही ॥३॥ निळा म्हणे पाठिवरी । बैसे हरी बैसे हरी बैसवी त्यां ॥४॥