वांटुनियां गडी चेंडु – संत निळोबाराय अभंग – २५१
वांटुनियां गडी चेंडु मांडियेली फळी ।
मेलासी धांवतां कान्हो नाटोपेचि बळी ॥१॥
येईल चेंडू हातारे ।
हरिसी शरण जातां ॥२॥
पाडिल्या लगोया जेणें तेणेंचि नेला डावो ।
वाउगीची शीणती येरें धांवतां गेले पावो ॥३॥
निळा म्हणे शरण गोपाळा जांई करीं तातडी ।
तरीच चेंडु येईल हातां पांगविसी गडी ॥४॥