मृदु मधुर वाजवीत वेणु – संत निळोबाराय अभंग २५
मृदु मधुर वाजवीत वेणु ।
सावळा नंदनु नंदाचा ॥१॥
तेणें गोपिका वेधल्या ।
पात्र झाल्या ब्रम्हसुखा ॥२॥
रंजवित्या विनोदवचनीं ।
हास्य करुनि हासवीतु ॥३॥
निळा म्हणे त्यांचिया गळां
घाली वेळोवेळां करपल्लव ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मृदु मधुर वाजवीत वेणु – संत निळोबाराय अभंग २५