तारुण्याच्या बळें घेऊं धांवाशिल झोंबी ।
पडलिया तळीं हांसो लागतील उभी ॥१॥
घेसी तरी घेई हरीसवें घाली मिठी ।
नेदी पडो तोचि वंदय करील ये सुष्टी ॥२॥
एकाहूनि एक बळी नये तुझया ध्याना ।
कुंथोनियां येसी तळा होईल तनाना ॥३॥
निळा म्हणे झोंबीलोंबी घेंई काळासवें ।
श्रीहरीच्या बळें मग वांटसील नांवे ॥४॥