पाडूनि लगोया चेंडुवाच्या – संत निळोबाराय अभंग – २४९

पाडूनि लगोया चेंडुवाच्या – संत निळोबाराय अभंग – २४९

पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घायें ।
सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय ॥१॥
खेळे ऐसा खेळ ।
मनीं धरुनि घननीळ ॥२॥
उडोनिया जातां चेंडु न सांभाळे उसी ।
धांवतांचि मरती पोरें होतीं कासाविसी ॥३॥
निळा म्हणे झेलूनियां घेंई वरिच्यावरी ।
एकविध भावें शरण जाऊनियां हरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाडूनि लगोया चेंडुवाच्या – संत निळोबाराय अभंग – २४९