पेहरंब्याचे सोई गे सारविसी भुई ।
परि येथें तेथें असे अवघाचि हरि पाही ॥१॥
कापवितां हात जरी सावधान चित्त ।
तरीच होईल मान न पवतां घातपात ॥२॥
नाचविसी पाय गे घोळसूनि भोय ।
परि नग्न दाखवितां जगीं हासे होय ॥३॥
निळा म्हणे बरा गे विचार करी धीरा ।
आठवूनि हदयांत राहे शारंगधरा ॥४॥