फुंकिसी जगा गडी – संत निळोबाराय अभंग – २४५

फुंकिसी जगा गडी – संत निळोबाराय अभंग – २४५

फुंकिसी जगा गडी गे तरि घालीं फुगडी ।
नाहीं तरी नको करुं फजिती रोकडी ॥१॥
मोडीं आंग बाई गे नाचण्याचे सोयी ।
आठवूनि श्रीहरिचा निजानंद देहीं ॥२॥
त्या नांव फुगडी गे बंधनातें तोडी ।
नाहीं तरि कांपवूनि काय टिया मांडी ॥३॥
निळा म्हणे जोडी गे देवासवें गडी ।
आठवूनि ध्यानीं मनीं रुप घडी घडी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

फुंकिसी जगा गडी – संत निळोबाराय अभंग – २४५