फिरविसी मान तरी पिंग्याच्या महिमान ।
नाहींतरी सरे परती जाई वो येथून ॥१॥
धरी हरि चित्तीं गे पिंगयाच्या निगुती ।
नाहींतरी वायां जासी भोवंडीचे भ्रांती ॥२॥
मोडशील माजगे तरीच पिंगा साजे ।
लाटण्याऐसी न लवतां फजितीचें भोज ॥३॥
निळा म्हणे सांगितले धरी हित कानीं ।
तरीच पिंगा मोड तुझा श्रीहरिचिंतनीं ॥४॥