तरिच पिंग्या गोडि गे – संत निळोबाराय अभंग – २४२
तरिच पिंग्या गोडि गे लावोनि आंग मोडी ।
नाहीं तरी परती सर म्हणती जा घांगडी ॥१॥
फिरविसी मान जरी हरीतें लक्षून ।
तरीच खेळ रुचेल तुझा मानवती जन ॥२॥
राये उभी नीट गे होउनियां धीट ।
नाहींतरी झोंके खातां म्हणती फटफट ॥३॥
निळा म्हणे श्रीहरि गे आठवी अंतरीं ।
तरीच पिंगा मानेल जगा धन्य म्हणती नारी ॥४॥