टिपरियाचे घाई गे – संत निळोबाराय अभंग – २४०

टिपरियाचे घाई गे – संत निळोबाराय अभंग – २४०

टिपरियाचे घाई गे नाच सुखें बाई ।
गितीं गाऊनियां हरिचें संगमसुख घई ॥१॥
नाचोनियां फेरि गे गुण त्याचे उच्चारी ।
जेणें काग बग रिठा मर्दियले वैरी ॥२॥
ऐसें गाई गाणें गे हरि जोडे जेणें ।
येर येऊं नेदी वाचे लटकी ते वांयाणे ॥३॥
निळा म्हणे नामें गे तोडी मरणजन्में ।
ऐसा हरि गीतीं गातां हरतील कर्मे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

टिपरियाचे घाई गे – संत निळोबाराय अभंग – २४०