मोहर्या पांवे तलालोरी – संत निळोबाराय अभंग २४
मोहर्या पांवे तलालोरी ।
नाचती गजरीं गीत गाती ॥१॥
शिंगें काहाळा मृदंग विणे ।
गाणें नाचणें निज छंदें ॥२॥
टिपरी घागर्या एकची घाई ।
उठिताती पायीं झणत्कार ॥३॥
निळा म्हणे रंगले रंगें ।
केलें श्रीरंगें आपणासें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.