कपाळ झेटि मिसे – संत निळोबाराय अभंग – २३७

कपाळ झेटि मिसे – संत निळोबाराय अभंग – २३७

कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटीं ।
तेंचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी ॥१॥
सहलाचिया खेळा गे जोडि घननीळा ।
नलगे कांही घेणें देणें परि हा तो जवळा ॥२॥
नमन हेंचि निज गे परमार्थाचें बिज ।
सहज भावें नमुं जातां जोडे अघोक्षज ॥३॥
निळा महणे आतां गे वर्म आले आतां ।
श्रीहरीच्या संगसुखें गाऊं गुणकथा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कपाळ झेटि मिसे – संत निळोबाराय अभंग – २३७