धरुनि हातीं हात पोरा – संत निळोबाराय अभंग – २३६
धरुनि हातीं हात पोरा धरिसी चिकाटी ।
न सुटेसि मग बाळिया सांपडता मुष्टी ॥१॥
धरिसी तरी धरि एक हरी चित्तीं मनीं ।
नाहीं तरी अहंकार गोविल वेसनिं ॥२॥
सोडवितां न सुटे त्या न सिवे आभिमाना ।
वांयां व्यर्थ कुंथोनियां पडसिल पतना ॥३॥
निळा म्हणे अंतरीचें जाणे हरि सर्व ।
तया हातिं हात देतां देईल तो वैभव ॥४॥