करितां उसी हातां नये चेंडु गमाविला ।
धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥
म्हणती म्हणे कीर ।
नाहींतरी घेंई फेर ॥२॥
अधिके अधिक्वरि साया घेऊं येती ।
गमावितां चेंडु हाल अवघेचि पहाती ॥३॥
निळा म्हणोनियां लावि लक्षडोळां ।
देईल हातीं चेंडु हरि कृपेचा कोवळा ॥४॥