मिळालें गोपाळ बैसलें पाळीं । मध्यें वनमाळी विराजला ॥१॥ या रे म्हणती खेळ मांडू । विटीदांडू लगोरीचा ॥२॥ हुंबरी बा रे नाचों फेरे । टिपरी अखरे भोंवताली ॥३॥ निळा म्हणे गाऊनि वाचें । कान्होबाचे पवाडे ॥४॥