मिळालें गोपाळ बैसलें – संत निळोबाराय अभंग – २३३
मिळालें गोपाळ बैसलें पाळीं ।
मध्यें वनमाळी विराजला ॥१॥
या रे म्हणती खेळ मांडू ।
विटीदांडू लगोरीचा ॥२॥
हुंबरी बा रे नाचों फेरे ।
टिपरी अखरे भोंवताली ॥३॥
निळा म्हणे गाऊनि वाचें ।
कान्होबाचे पवाडे ॥४॥