बैसवूनि आले गोधनें – संत निळोबाराय अभंग – २३२

बैसवूनि आले गोधनें – संत निळोबाराय अभंग – २३२

बैसवूनि आले गोधनें आखरीं खेळ नानापरी मांडियेला ॥१॥
वाजविती पावे मोह्या घमुती ।
छंदें त्या नाचती गाती ब्रीदें ॥२॥
आलके सेलके हमामा हुंबरी ।
झोंब्या घेती कुसरी निवडुनी गडी ॥३॥
लगोरियाचे चेंडु सुरकाडी मुरदांग ।
नानापरि आंग मोडुनियां ॥४॥
निळा म्हणे हरी पाहोनी निराळा ।
अवघियांच्या खेळा साक्षपणें ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बैसवूनि आले गोधनें – संत निळोबाराय अभंग – २३२