पुन्हां पेहरंब्याच्या सुखें – संत निळोबाराय अभंग – २३१

पुन्हां पेहरंब्याच्या सुखें – संत निळोबाराय अभंग – २३१

पुन्हां पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरिमुखें ।
वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखें ॥१॥
देईल तोचि पानें गे गौरवुनी मानें ।
खोबरियाच्या वाटया माळा गळांचीं सुमनें ॥२॥
उदार हा दानीं गे लोकीं त्रिभुवनीं ।
तोचि ध्याई चित्तीं आतां करिल सुखा धणी ॥३॥
निळा म्हणे सर्व खेळीं खेळा साक्षभूत ।
तोचि जंनी वनीं सये नांदे हदयांत ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुन्हां पेहरंब्याच्या सुखें – संत निळोबाराय अभंग – २३१