चुचकारुनि गोधनें बैसविलीं आखरीं ।
म्हणती याहो श्रीहरी खेळों आतां ॥१॥
धावतीं वोढाळें आवरिलीं सकळें ।
झालों तुझिया बळें बळीवंत ॥२॥
नाचवीसी तैसे नाचों सुखें आतां ।
काळाचिया माथां ठेवूनि पाय ॥३॥
निळा म्हणे केलों सांगाती दैवाचे ।
देऊनि सुखाचें भोजन आजी ॥४॥