सुंदर उटी मलयागरे – संत निळोबाराय अभंग २३
सुंदर उटी मलयागरे ।
वेढिलीं चिरें पापेंचि ॥१॥
मोरपिसें मुगुटावरी ।
मुरली अधरी वाजवितु ॥२॥
घनश्याम हा मदनमूर्ती ।
झळके दीप्ती पदकाची ॥३॥
निळा म्हणे पांडूरंग ।
संतसंग भोंवताला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.