खेळवी चालवी – संत निळोबाराय अभंग – २२९
खेळवी चालवी ।
हातीं धरुनियां नाचवी ॥१॥
ऐसी कृपेची ओतली ।
माझी विठाई माउली ॥२॥
जाणे भुक तहान ।
वारा लागों नेदी ऊन ॥३॥
निळा म्हणे लाड ।
पुरवी करुनियां कोड ॥४॥
खेळवी चालवी ।
हातीं धरुनियां नाचवी ॥१॥
ऐसी कृपेची ओतली ।
माझी विठाई माउली ॥२॥
जाणे भुक तहान ।
वारा लागों नेदी ऊन ॥३॥
निळा म्हणे लाड ।
पुरवी करुनियां कोड ॥४॥