संत निळोबाराय अभंग

आहाडे पाहाडे गे – संत निळोबाराय अभंग – २२८

आहाडे पाहाडे गे – संत निळोबाराय अभंग – २२८


आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे ।
नको करुं बाई आतां पाहे मागें पुढें ॥१॥
सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग ।
त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥
वेडया वाकुडया गोठी गे नको काढूं वोठी ।
ध्यानीं मनीं गीतीं गाई कान्हो जगजेठी ॥३॥
निळा म्हणे निंदास्तुति जयासि समान ।
त्याचि सवें बोल उणे करिल बहुमान ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आहाडे पाहाडे गे – संत निळोबाराय अभंग – २२८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *