आतां माझ्या सहवासें रहा । होईल पहा कौतुक तें ॥१॥ चला जाऊं मांडू खेळ । म्हणती गोपाळ बहुत बरें ॥२॥ खेळों हुतुतु वांटुनि गडी । पुढेंहि परवडि विटिदांडू ॥३॥ निळा म्हणे श्रीहरि शहाणा । नागवेचि कोण डाया तळीं ॥४॥