अंतरंग माझे गडी । न गमे तुम्हांवांचूनि घडी ॥१॥ या रे जवळीं फांकों नको । झकवल्यावसें कोणा लोकां ॥२॥ तुमचा गोड वाटे संग । शहाणे उबग मज त्यांचा ॥३॥ निळा म्हणे भाविकांप्रती । येऊनि काकुळती बोलतु ॥४॥