येऊनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तया बहुता गानें ॥१॥ चला जाऊं घरां हरीसवें चालती । आनंदें नाचती भोंवताले ॥२॥ इंद्रादिकां देवां नाहीं तैसें सुख । अवलोकिती मुख गोविंदाचें ॥३॥ निळा म्हणे जन्म नाहीं तयां मरण । अवलोकिती सगुणरुप डोळे ॥४॥