संत निळोबाराय अभंग

येऊनियां गडी वंदिती – संत निळोबाराय अभंग – २२३

येऊनियां गडी वंदिती – संत निळोबाराय अभंग – २२३

येऊनियां गडी वंदिती कान्हया ।
आळंगितो तया बहुता गानें ॥१॥
चला जाऊं घरां हरीसवें चालती ।
आनंदें नाचती भोंवताले ॥२॥
इंद्रादिकां देवां नाहीं तैसें सुख ।
अवलोकिती मुख गोविंदाचें ॥३॥
निळा म्हणे जन्म नाहीं तयां मरण ।
अवलोकिती सगुणरुप डोळे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येऊनियां गडी वंदिती – संत निळोबाराय अभंग – २२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *