या रे गडिहो घेऊं – संत निळोबाराय अभंग – २२२

या रे गडिहो घेऊं – संत निळोबाराय अभंग – २२२

या रे गडिहो घेऊं धणी ।
काला वदनीं श्रीहरीचा ॥१॥
सांडूनियां अभिमान दुरी ।
नाचों फेरी गोविंदा ॥२॥
देखोनियां भाव अंतरींचा ।
देईल हातींचा विभाग ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हारस ।
उरलें शेष हरीचें तें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

या रे गडिहो घेऊं – संत निळोबाराय अभंग – २२२