जन्मोजन्मी तुमचे दास । न करुं आस आणिकांची ॥१॥ हें तों तुम्ही जाणां देवा । तरि कां ठेवा बोल आम्हां ॥२॥ कान्हो म्हणती पहिलें मन । सखे सज्जन तुम्ही माझे ॥३॥ निळा म्हणे देईन धणी । ऐसिच चक्रपाणी म्हणे तया ॥४॥