क्रीडा करी गोपाळपुरीं – संत निळोबाराय अभंग – २१९
क्रीडा करी गोपाळपुरीं ।
आपण श्रीहरी गोवळांसवें ॥१॥
वेणुवादन सप्तस्वरें ।
वेधी जिव्हारें सकळांची ॥२॥
नृत्य करी नाना छंदें ।
नाचवी विनोदें संवगडियां ॥३॥
निळा म्हणे दधिओदन ।
काला कालावून जेवितु ॥४॥