कान्होबाचें चाटुनियां आंग – संत निळोबाराय अभंग – २१८

कान्होबाचें चाटुनियां आंग – संत निळोबाराय अभंग – २१८

कान्होबाचें चाटुनियां आंग ।
म्हणती मग पोट धालें ॥१॥
रोज ऐसिची देंई धणी ।
लागती चरणीं गोपाळ ॥२॥
म्हणती गोविंद मोठे व्हाल ।
मग तुम्हीं जाणें सांडाल सोंय माझी ॥३॥
निळा म्हणे ते वाहती आण ।
नेणों सुजाण तुजविण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कान्होबाचें चाटुनियां आंग – संत निळोबाराय अभंग – २१८