कावडी भरुनि आणिलीं क्षीरें । दहीं घृत सारें नवनीतें ॥१॥ आदनाचेही पर्वत आले । माजि ते केले मिश्रित ॥२॥ भोंवते गोपाळ मध्यें हरी । दाविती कुसरी नृत्याची ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हानंदु । लोटला सिंधु क्षीराचा ॥४॥