होतें बहुत दिवस – संत निळोबाराय अभंग – २१०

होतें बहुत दिवस – संत निळोबाराय अभंग – २१०


होतें बहुत दिवस आर्त वागविलें ।
आजी अकत्मात तें फळ देऊं आलें ।
दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें ।
घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो ॥१॥
धन्य हे आनंदाची सापडली वेळ ।
तेणें संत सज्जन भेटले कृपाळ ।
त्यांनींचि फेडियेला बुध्दीचा वो मळ ।
दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥
नाना साधनांच्या केलिया खटपटा ।
परी त्या न पावतीचि वो याच्या दारवंटा ।
जाणो जातां जाणिव घाली आडफांटा ।
योगाभ्यासें सिध्दी रोधिताती वाटा वो ॥३॥
यज्ञयागें स्वर्गभोग आड येती ।
करितां तपें काम क्रोध खवळती ।
नित्यानित्यज्ञानें अभिमान वाढती ।
करितां तीर्थाटनें अहंकाराचीचि प्राप्ती वो ॥४॥
जपतां मंत्रबीजें चळचि घाली घाला ।
करीतां दान धर्म पुढें भोगवितो फळा ।
सोंवळे मिरवितां विधिनिषेध आगळा ।
आतां हेंचि बरवे धणी पाहों याला वो ॥५॥
ऐसे शोधियले मार्ग नानापरी ।
न येती प्रतीति मग सांडियले दुरी ।
आतां गाऊनि गीतीं नाचों हा मुरारी ।
निळा म्हणे करुं संसारा बोहरी वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

होतें बहुत दिवस – संत निळोबाराय अभंग – २१०