येणें एकलें वो जाणेंही – संत निळोबाराय अभंग – २०७

येणें एकलें वो जाणेंही – संत निळोबाराय अभंग – २०७


येणें एकलें वो जाणेंही शेवटीं येथें राहणेचि नाहीं कल्पकोटी ।
जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी ।
म्हणेनि आलिये या सांवळियाचे भेटी वो ॥१॥
आतां घाला वो याच्या पायांवरी ।
हाचि चुकवील जन्माचि भोंवरी ।
शिणलें बहुत वो चौंयांयशींचे फेरीं ।
तोडिल चिंता हा हेचि आशा थोरी वो ॥२॥
बहुत गांजियलें मायामोहभ्रमें ।
रततां विषयीं या विषयाच्या कामें ।
करितां भरोवरी रित्या मनोधर्मे ।
याशी कृपा येतां हरील हा कर्मे वो ॥३॥
काम क्रोधीं वो जाचिलें बहुत ।
नेदी राहो वो क्षण एक निवांत ।
वरी पडती वो गर्वाचे आघत ।
म्हणोनि विनवणी सांगा त्वरित वो ॥४॥
आशा कल्पना या मातल्या पापिणी ।
मनशा चिंता डंखिती सर्पिणी ।
येती लहरी वो जाणिवेचि जाचाणी ।
म्हणोनि विनवितें हेंचि क्षणक्षणीं वो ॥५॥
आहे शेवटींचें माझें येथें पेणें ।
वाटे निश्चय हा याचिया दर्शनें ।
राहिलें चित्तीं वो याचेंचि चिंतन ।
निळा म्हणे आजि ऐकिलें गाहाणें वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येणें एकलें वो जाणेंही – संत निळोबाराय अभंग – २०७