संत निळोबाराय अभंग

भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला – संत निळोबाराय अभंग – १९८

भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला – संत निळोबाराय अभंग – १९८


भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला ।
देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला ।
नेणों आनंदाचा प्रवाह लोटला ।
ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो ॥१॥
म्हणे केले ते पावले उपचार ।
तुम्ही आवडीनें प्रेमाचे प्रकार ।
झाली तृप्ति आतां घ्यावो देतों वर ।
पुन्हां नातळो हा तुम्हांसि संसार वो ॥२॥
तातल्या सोसूनियां विरक्तिच्या ज्वाळा ।
बरव्या शिजविल्या समृध्दी सकळा ।
झाला रसस्वाद भोजनीं आगळा ।
वाढिलीं पंचामृतें जेवतां जे वेळोवेळां वो ॥३॥
ऐसें जेऊनियां घाले विश्वंभर ।
भक्ता उभविला अभयाचा कर ।
काढुनी घालिती कठींचे तुळसीहार ।
निळया स्वामी गौरविती वारंवार वो ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला – संत निळोबाराय अभंग – १९८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *