देवें भक्तालागीं उपचार – संत निळोबाराय अभंग – १९५

देवें भक्तालागीं उपचार – संत निळोबाराय अभंग – १९५


देवें भक्तालागीं उपचार मांडिले ।
शांति सुखसनी मागें बैसविलें ।
धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें ।
ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥
सुखें राज्य करा म्हणे त्रिमुवनीं ।
माझें ऐश्वर्य हें सर्वांगी लेंउनी ।
मिरवा भूषणें हीं यश कीर्ति दोन्हीं ।
माझीं आयुधें हीं देतों संतोषोनी वो ॥२॥
शांती विरक्ती हे मूर्तिमंत दया ।
क्षमा नित्यानंदें तुम्हां अर्पिलिया ।
अखंड नैराश्यता सेवे तुमचिया ।
ठेविली निकट वासें नवजती आन ठाया वो ॥३॥
निळा म्हणे ऐसा भक्तांचा समुदाय ।
देवैं आनंदविला प्रीतीच्या उत्साहें ।
म्हणे निर्भय असा जवळीच मी आहें ।
भोगा सुख माझें निजाचें अव्दय वो ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देवें भक्तालागीं उपचार – संत निळोबाराय अभंग – १९५