संत निळोबाराय अभंग

एक ना दुसरें वो नव्हते – संत निळोबाराय अभंग – १९०

एक ना दुसरें वो नव्हते – संत निळोबाराय अभंग – १९०


एक ना दुसरें वो नव्हते मजपांशी ।
मी मज नोळखतां आप आपणासी ।
होति ये निर्जनी वो निराभास देसीं ।
नेणों कोणें आणियेलें कर्मभूमिसी ॥१॥
तैंसपासूनियां विसरलें निजसुखा ।
वाटे जीव माझाचि परि मज वो पारिखा ।
देखोनि आपपर पात्र जालें बहु दु:खा ।
सांगो कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥२॥
मी मज माझियानि वेढाळिलें बाई ।
चित्तासि या चिंतने वो घातलें प्रवाही ।
नेणेंचि विश्रांति कोठे विचरतां मही ।
जेथूनियां आलिये ते नाठवेचि कांही वो ॥३॥
नसतेंचि काम क्रोध लागले हे वैरी ।
येऊनियां आशा चिंता बैसल्या जिव्हारी ।
व्दैषनिंदेचिया नित्य नाना भरोवरी ।
कामना कल्पना ह्या दाटल्या शरीरीं वो ॥४॥
किती तरी करुं या संसारा पुरवणी ।
किती सोसू येऊं जाऊं यमाची जाचणी ।
किती येऊं जाऊं भोगूं नाना यातिचिया खाणी ।
किती गर्भवासी बैसों थर अडचणि वो ॥५॥
ऐसि जाजावलि बहु अनुतापें बाळा ।
घेऊनियां विकृतियां विषयाचा कंटाळा ।
मनोभावें चिंतिला बा श्रीरंग सांवळा ।
पावली निजस्थान पुनरपि म्हणे निळा वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक ना दुसरें वो नव्हते – संत निळोबाराय अभंग – १९०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *