आजि पुरलें वो आतींचें – संत निळोबाराय अभंग – १८९
आजि पुरलें वो आतींचें आरत ।
होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित ।
मना आवरुनि इंद्रयां सतत ।
दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥
तेंचि घडोनियां आलें अनाययसें ।
जातां यशोदे घरा वाणचिया मिसें ।
आला खेळत खेळत बाळवेषें ।
कवळी घालि मिठी गदगदां हांसे वो ॥२॥
मुख अमृताचा मयंक उगवला ।
दंत हियाचा प्रकाश फांकला ।
नयनीं रत्पकीळ तारा वो चमकला ।
देखतां ह्रदयीं निजवास त्याचा झाला वो ॥३॥
जन्म जन्मांतरी बहु केले सायास ।
याचें भेटिलागीं व्रतें उपवास ।
सेविलीं गंगेची तटाकें उदास ।
त्याचिया सुकृताचे आले नेणों घोष वो ॥४॥
आजि आनंदाशी आनंद माझया झाला ।
आजि सुखशीं सुखें लाभ केला आजि हर्शाषीं हर्ष भेटों आला ।
तेणें श्रीरंग निजदृष्टी स्थिरावला वो ॥५॥
भोग भोगितां वो सरले समस्त ।
गेलें उडोनियां प्रारब्ध संचित ।
विटलें विषयावरुनियां चित्त ।
निळा म्हणे घडला हरिशीं एकांत वो ॥६॥