येतां देखोनियां भार । गाई मनोहर गोवळांचे ॥१॥ धांवचि घेऊनि गौळणी येती । पाहावया श्रीपती मदनमूर्ती ॥२॥ एकीस न पुसतां एकी । माय लेकी सास्वा सुना ॥३॥ निळा म्हणे पाहोनि मुख । भोगताती सुख कैवल्यापर ॥४॥