बोलती बोलणें चालती – संत निळोबाराय अभंग – १८६
बोलती बोलणें चालती चालणें ।
करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥
जेविती जेवणीं खेळत खेळणीं ।
मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥
गीतीं गाती गीत विनोदीं हांसती ।
रुदनीं रुदत परि त्या कृष्णीं ॥३॥
निळा म्हणे सुखें भोगिती नानाभोग ।
परि त्यांचे श्रीरंग ध्यानी मनीं ॥४॥