बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥ सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥ सोयरेसज्जनइष्टमित्रजन । कन्याकुमरेधन कृष्णचि गोत ॥३॥ निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव । पशुवादिक सर्व झाला कृष्ण ॥४॥