करितां तयां काम धाम । तमाळश्याम ध्यानीं मनीं ॥१॥ तेणें पावल्या आनंदा । वेधीं गोविंदा वेधलिया ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्ती आंत । नेणेति माता आणिकांची ॥३॥ निळा म्हणे अहोरात्रीं । देखती नेत्रीं तेंचि रुप ॥४॥