एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥ तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा । चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥ एकी म्हणती हा आमुचा गोवळ । सहावी म्हणे बाळ नंदाचा कीं ॥३॥ निळा म्हणे जैशा श्रुती विवादती । तैशा या भांडती परस्परें ॥४॥